मुंबई : राज्यातील किशोरवयीन मुलींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत केली.
अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्याची मोठया प्रमाणात महिलांमधून मागणी होत आहे. त्यामुळे ही योजना राज्यात पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी अस्मिता योजना पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
राज्यातील महिलांसाठी पाच रुपयात आठ सॅनिटरी पॅड देणारी अस्मिता योजना तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी २०१८ मध्ये सुरु केली. २०१९ मध्ये ५० हजार बचत गटांनी सॅनिटरी पॅड विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी जवळपास ४५ हजार बचत गटांना ऑर्डरही मिळाल्या. पण, एप्रिल २०२२ पासून कंत्राट संपल्याने सदर योजनेची अंमलबजावणी राज्यात बंद आहे याकडे राज्यसरकारचे लक्ष वेधले
हे पण वाचा…
रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, उद्या ‘या’ वेळेस प्रवासी आरक्षण व्यवस्था राहणार बंद
10वी ते पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स..! स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 5369 पदांची भरती
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती जाहीर ; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स..
मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सभागृहात सांगितले की, ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्यात आली. महिलांच्या आरोग्याचा दृष्टीने ही महत्त्वाची योजना आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुलभ पद्धतीने करण्यासाठी सर्व महिला आमदारांसोबत अधिवेशन काळात बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.