मुंबई : जर आज तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल, तर तुम्हाला आज अधिकचे पैसे मोजावे लागतील. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरणीचे सत्र सुरु होते, मात्र आज म्हणजेच १० मार्च रोजी सोने-चांदीची झळाळी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. लक्षात घ्या की राज्य कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीत सातत्याने बदल होत असतात.
सोन्या-चांदीचा आजचा भाव
आज जर तुम्ही बाजारात सोन्या किंवा चांदीच्या खरेदीला जाणार असाल तर कालपेक्षा थोडे जास्त पैसे मोजण्यासाठी तयार राहा. २४ कॅरेट सोने सर्वात शुद्धतेचे मानले जाते आणि आज देशात त्याचा भाव ५६ हजार २१० रुपये झाला आहे. काल सोन्याचा भाव ५५ हजार ६८० रुपये प्रति १० ग्रॅमवर क्लोज झाला होता, अशाप्रकारे आज त्यात ५३० रुपयाची भर पडली आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ५१,५५० रुपये प्रति १० ग्रॅम असून काल म्हणजेच गुरुवार, ९ मार्च २०२३ रोजीच्या ५१ हजार ०५० रुपयांच्या तुलनेत आज ५०० रुपये मांगले आहे. याशिवाय आज चांदीचा भाव कालच्या दराच्या तुलनेत २०० रुपयांनी कमी झाला आहे. आज चांदीची किंमत ६५ हजार २५० रुपये प्रति किलोच्या जवळपास आहे. तर काल ६५ हजार ०५० रुपये प्रति किलो होता.
हे पण वाचा..
मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याच्याच भावाला ईडीने घेतलं ताब्यात ; राज्यातील राजकारणात खळबळ
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM किसान व्यतिरिक्त फक्त 1 रुपयात मिळणार ‘हा’ लाभ
भटक्या बैलाने चिमुरड्याला थेट शिंगाने उचललं अन्.. काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
महानगरांमध्ये आज सोन्याचा दर
मुंबईत २४ कॅरेट सोने ५६,०७० रुपये प्रति १० ग्रॅम तर २२ कॅरेट सोने ५१,४०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे.
दिल्लीत २४ कॅरेट शुद्ध सोने ५६,२१० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१,५५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,६२० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,९०० रुपये प्रति १- ग्रॅम आहे.