मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागालँडमध्ये भाजपला पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. यादरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीवर जोरदार प्रहार केला आहे. सभागृहात गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये पन्नास खोके, एकदम ओके झाल्याचा आरोप केला.
गुलाबराव पाटील म्हणाले, देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले असे बरेच स्टेटमेंट पेपरामधून आणि टीव्हीतून बघतोय. नागालँडमध्ये राज्यातला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्यांना. बदलाचे वारे पाहा कसे वाहायला लागले.
हे पण वाचाच..
जळगाव जिल्ह्यातील २ सरपंच, ४ ग्रामपंचायत सदस्य अपात्र
अरे काही लाच लज्जा..! चालत्या बाईकवर प्रेमी युगुलांच्या रोमान्सचा VIDEO व्हायरल
महाराष्ट्रात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात मेगाभरती; 10वी, ITI, पदवीधरांना नोकरीचा चान्स
सर्वसामान्यांना पुन्हा झटका ! राज्यात पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी महाग, नवीन दर जाणून घ्या
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, मला तरी असे वाटतेय की नागालँडमध्ये सुद्धा पन्नास खोके, बिलकुल ओके झालेय का. अशा पद्धतीची शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकीकडे जातीयवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे जाऊन मांडीला मांडी लावून बसायचे. आणि बदलाचे वारे कसे वाहायला लागले आहे. आमचे म्हणणे आहे की, पन्नास खोके नागालँड ओके, असे झालेय का. हा माझा सवाल आहे.