मुंबई : मागील अनेक महिन्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे ठेवले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीय. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर घसरले असतानाही देशवासीयांना महागड्या पेट्रोल डिझेल पासून दिलासा दिला जात नाहीय. मात्र आज गुरुवारी सकाळी अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. आज यूपी, हरियाणा आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात पेट्रोल 1.30 रुपयांनी महागले आहे. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैशांनी महाग होऊन 96.47 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढून 89.66 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.
फरिदाबादमध्ये आज पेट्रोल 27 पैशांनी महागले असून ते 97.49 रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेल 26 पैशांनी वाढले असून 90.35 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात पेट्रोलचा दर 1.30 रुपयांनी वाढून 108 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 2.76 रुपयांनी वाढून 95.96 रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड स्वस्त झाले आणि प्रति बॅरल $82.70 वर विकले गेले. WTI ची किंमत देखील प्रति बॅरल $76.70 पर्यंत घसरली आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर