मुंबई : सरकारी कामात अडथळा आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक करणे आमदार बच्चू कडू यांना चांगलेच महागात पडले आहे. कारण याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने आ. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडालीय.
नेमकं प्रकरण काय?
2017 साली नाशिक (Nashik) महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.
हे सुद्धा वाचा..
महावितरण सर्वसामान्यांना देणार हाय वोल्टेजचा झटका ; दरवाढीबाबत वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय
सावधान! देशात हा विषाणू झपाट्याने पसरतोय ; लक्षणे आणि उपाय जाणून घ्या..
राजकारणातील मोठी बातमी! इथे राष्ट्रवादीने घेतला भाजपसोबत जाण्याचा निर्णय
अदानी पॉवरबाबत मोठे अपडेट..! ‘या’ अटी झाल्या पूर्ण, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?