नवी दिल्ली : आता अदानी समूहाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. वास्तविक, अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरने अदानी पॉवर (मुंद्रा) सह त्यांच्या सहा उपकंपन्या स्वतःमध्ये विलीन केल्या आहेत. यानंतर ते आता अदानी पॉवरमध्ये विलीन झाले आहेत. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने फेब्रुवारी महिन्यात या कंपन्यांचे एपीएलमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली होती. अदानी पॉवरनेही त्याची माहिती बीएसईला पाठवली आहे.
अदानी पॉवर
मंगळवारी बीएसईला पाठवलेल्या संप्रेषणात अदानी पॉवरने सांगितले की, अदानी पॉवर लिमिटेड (एपीएल) च्या सहा पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अदानी पॉवर महाराष्ट्र लि. (APML), अदानी पॉवर राजस्थान लिमिटेड (APRL), उडुपी पॉवर कॉर्पोरेशन लि. (UPCL), रायपूर एनर्जी लि. (REL), रायगड एनर्जी जनरेशन लि. (REGL) आणि अदानी पॉवर (मुंद्रा) लि. समाविष्ट आहेत.
अदानी ग्रुप
8 फेब्रुवारी 2023 रोजी, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या अहमदाबाद खंडपीठाने या कंपन्यांचे APL मध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली. या योजनेच्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व अटी पूर्ण करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकन फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी रोजी दिलेल्या अहवालात अदानी समूहावर आर्थिक फसवणूक आणि शेअर्सच्या किमती वाढवताना हेराफेरीचा आरोप करण्यात आला होता.
अदानी
हिंडेनबर्गचे सर्व आरोप समूहाने बिनबुडाचे ठरवून फेटाळून लावले असले, तरी त्याच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती सतत घसरत राहिल्या. स्थिती अशी झाली आहे की, अहवालाच्या एका महिन्यातच अदानी समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 60 टक्क्यांहून अधिक घसरले आहे. तसे, गेल्या आठवड्यापासून ही घसरण आटोक्यात आली आणि पुन्हा शेअर्सच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे.