मुंबई : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना सुरू करण्यात आली असून यासाठी अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हालाही मोफत प्रधानमंत्री सौर पॅनेल योजनेचा लाभ घेईचा असेल तर तुम्हीही अर्ज करू शकता. या योजनेतून तुम्हाला मोफत सौर पॅनेल मिळेल.
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वीज बिलातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान सौर पॅनेल योजना सुरु करण्यात आली आहे. शेतीच्या सिंचनासाठी सौर पंप उपलब्ध करून देण्यासाठी ९० टक्के अनुदान दिले जात आहे.
ही योजना काही राज्यांमध्ये अर्ज सुरू झाले आहेत. त्यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाब या राज्यांमध्ये, राज्य सरकारने सौर पंपांसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात 2 लाख सौर पॅनेल बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हे पण वाचाच..
गुलाबराव पाटलांच्या नादी काय लागतात, मी… गुलाबरावांचा इशारा कुणाला?
शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : आज कुठे कोसळणार पाऊस, वाचा हवामान खात्याचा अंदाज?
सुप्रिया सुळे मटण खाऊन महादेवांच्या मंदिरात गेल्या? शिवसेनेच्या नेत्याने फोटो-व्हिडीओ केला शेअर
सौर पंपासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचे आधार कार्ड.
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
शेतीची कागदपत्रे
बँक खाते पासबुक.
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजनेसाठी
जर तुम्हीही शेतकरी असाल तर या योजनेसाठी अर्ज करू शकता. शेतीच्या सिचंनासाठी केंद्र सरकारने सौर पॅनेल योजनेवर ९० टक्के अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे शेतकरी आता सौर पॅनेलद्वारे शेतीसाठी सिंचन करू शकतात.