जळगाव :शिदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील हे दारावर जातात व ते फोटो व्हॉट्सअप वर टाकतात अशी टीका काही विरोधकांकडून करण्यात आली होती. आता या विरोधकांचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतला आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर देखील सडकून टीका केलीय.
काय म्हणाले पाटील?
गुलाबराव पाटलांच्या नादी काय लागतात, मी बारक्यांची लढाई करत नसून संजय राऊतांना ही मी घाम आणतो. त्यामुळे गुलाबराव पाटील इतका छोटा माणूस नसून सभागृहात उभा राहिलो तर समोरच्याला वाटतं मी काय करेल आणि काय नाही, असा थेट इशारा गुलाबराव पाटलांनी टीका करणाऱ्या विरोधकांना दिला आहे.
तसंच, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत 38 वर्षाचा तरुणाबांड एकनाथ खडसेंना आडवा करून निवडून आला म्हणून मंगेश चव्हाण यांना आम्ही चेअरमन केलं. आमदार मंगेश चव्हाण त्यांच्या घरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा दोन कोटी रुपयांचा त्यामुळे असा माणूस दूध कसा भ्रष्टाचार करेल, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंवर केली.