नवी दिल्ली : तुम्ही दागिने खरेदी किंवा विक्री करत असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचा. कारण केंद्र सरकारने सोने आणि दागिन्यांच्या विक्री आणि खरेदीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.
बदलानुसार, 1 एप्रिल 2024 पासून, सोने आणि त्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क केलेला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे अनिवार्य आहे. तसे नसल्यास सोने बाजारात विकता येणार नाही.
मंत्रालयाचे म्हणणे आहे की, आता फक्त 6 अंकी हॉलमार्क वैध असेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, लोक 4 आणि 6 अंकांमुळे म्हणजे 2 वेगवेगळ्या प्रकारच्या हॉलमार्कमुळे गोंधळात पडले होते. हॉलमार्कच्या लेखन पद्धतीत आणखी एक बदल करण्यात आला आहे. पूर्वी अंक हॉलमार्किंग होते, जे अल्फान्यूमेरिक (अंक आणि अक्षरे असलेले) करण्यात आले आहेत. आता 4 अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होणार आहे.
हे पण वाचा..
चोपडा तालुका हादरले ; किरकोळ वादातून घेला तरुणाचा जीव
चोपडा: मुलाला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न फसला ; पोलिसांनी पालकाला दिला चोप, Video व्हायरल
मनसे नेत्यावर हल्ला करणारे सीसीटीव्हीत कैद
HUID म्हणजे काय? :
प्रत्येक दागिन्याची स्वतःची वेगळी ओळख असते. या क्रमांकाच्या मदतीने ग्राहकाला सोने आणि त्याच्या दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळेल. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता बरीच कमी होईल. ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर टाकावी लागेल. प्रत्येक ज्वेलरीवर मॅन्यूअली यूनिक नंबर लावला जाईल. काय सांगता! होळी खेळण्यासाठी मिळतेय सोन्या-चांदीची पिचकारी, किती आहे किंमत?
नवीन हॉलमार्कशिवाय दुकानदार सोने किंवा दागिने विकू शकणार नाहीत. परंतु ग्राहक 1 एप्रिलनंतरही जुने हॉलमार्क असलेले दागिने ज्वेलर्सला विकू शकतात.