मिस युनिव्हर्स राहिलेल्या 47 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनबद्दल अशी बातमी आहे, की तिच्या चाहत्यांना धक्का बसेल. सुष्मिता सेनला हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याची माहिती तिनेच खुद्द सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी तिला चाहत्यांनी तिच्या आरोग्याची काळजी घ्यायला सांगितले आहे.
अभिनेत्रीची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जी वाचल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. नेहमी तंदुरुस्त राहणाऱ्या सुष्मिता सेनने अशी धक्कादायक पोस्ट टाकली आहे की ती वाचून सगळेच हैराण झाले आहेत. अभिनेत्रीने तिच्या वडिलांसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘नेहमी तुमच्या हृदयाची काळजी घ्या. काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला होता. अँजिओप्लास्टी करून स्टेंट टाकण्यात आला. माझे हृदयरोगतज्ज्ञ म्हणाले की तुमचे हृदय खूप मोठे आहे. ज्यांनी वैद्यकीय मदत दिली त्या सर्वांचे आभार.
यासोबत सुष्मिता सेनने पुढे लिहिले- ‘ही पोस्ट माझ्या त्या सर्व चाहत्यांसाठी… की मी आता बरी आहे आणि पुन्हा आयुष्यात परतले आहे.’अभिनेत्री नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दुसरीकडे, वर्क फ्रंटवर, अभिनेत्री लवकरच आर्या 2 मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्रीचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.