महाराष्ट्र राज्यातील अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशात मानवी तस्करी झाल्याची धक्कादायक माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. दरम्यान पीडित महिलांची – सोडवणूक करण्यासाठी महिला आयोगाचे युद्धपातळीवर काम सुरु असल्याचे देखील सौ. रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
राज्य महिला आयोग आपल्या दारी
‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रम अंतर्गत मंगळवार दिनांक २८ रोजी रुपाली चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यावर जनसुनावणी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता धक्कादायक माहिती दिली.राज्यातील महिलांना परदेशात काम देतो असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांची कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांचा छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ ओमान देशात फसवून नेलेल्या महिलेचा आला होता. या व्हिडीओवरून मुंबईत ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी महिला आयोगाने पत्रव्यवहार केला आहे. पुढील ५ ते ६ महिन्यांत सर्व महिलांची सुटका केली जाईल,
महत्वाच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी ????????क्लिक करा…
एक लाखाच्या वर पगाराच्या नोकरीसाठी येथे करा अर्ज….
महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलिंडर तब्बल इतक्या रुपयांनी महागला..ताजे दर पहा…
आज 1 मार्चपासून बदलणार अनेक नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या कसे…
अशी संधी पुन्हा मिळणार नाही.. लग्नसराईत सोने 3500 रुपयांनी स्वस्त
गौतमी पाटीलच्या त्या व्हिडीओ प्रकरणी लवकरच कारवाई…
नृत्यांगना गौतमी पाटील हिचा चेंजिंग रुममधील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत सायबर सेलच्या पोलिस अधीक्षकांना महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. निश्चितच कारवाई केली जाईल, असे चाकणकर यांनी सांगितले.