सोशल मीडियावर एक शासकीय अधिकाऱ्याचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बीडचा धारूर पंचायत समितीच्या मुजोर अभियंत्याने गुंडालाही लाजवेल अशी धमकी दिली आहे.
नेमका प्रकार काय?
धारूर पंचायत समितीच्या वतीने जहागीर मोहा या गावात खडीकरणाचे काम व मुरमाचे काम धनगर वस्ती रोडवर सुरु आहे.रस्त्याचे काम चांगले करावे अशी मागणी करण्यासाठी गावकरी गेले असतां, त्यांची समजूत काढण्याऐवजी मुजोर अभियंता ग्रामस्थांना धमकी देत म्हणाला यांना जेसीबीच्या खोऱ्याखाली घे खडा खोदून त्यांना पुरून टाका या धमकीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. सय्यद मुजाहिद असं या मुजोर अभियंताचे नाव आहे.
"जे मध्ये येतील त्याला जेसीबी खाली घ्यायच.."
बीडमध्ये अधिकऱ्यांची गुंडागर्दी. (Video Credits : Vinod Jire)
बीडच्या धारूर पंचायत समितीच्या मुजोर अभियंत्यांची गुंडालाही लाजवेल अशी धमकी..#Beed #DhananjayMunde #Police #BeedNews #Mahavitaran #ViralVideo #DevendraFadnavis pic.twitter.com/pCLoDRrBEV
— Satish Daud Patil (@Satish_Daud) February 28, 2023
तर त्याच्या विरोधात गावकऱ्यांनी धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे तक्रारीत अभियंताकडे पिस्तूल असून पिस्तुलीचा धाक देखील दाखवत असल्याचे म्हटले आहे