नवी मुंबई : हार्बर मार्गावरील नेरुळ – उरण रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन रुळावरून खाली घसरली आहे. हा अपघात खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ घडला असून या अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ IBN लोकमतने प्रसारित केला आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी या अपघाताबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, ‘बेलापूर ते खारकोपर लोकल ट्रेनचे ३ डबे खारकोप स्थानकाजवळ रुळावरून घसरले.
नवी मुंबईत दुर्घटना; लोकल ट्रेन पटरीवरून घसरली#navimumbai #localtrain #mumbailocal #news18lokmat pic.twitter.com/7bV4z3GDGt
— News18Lokmat (@News18lokmat) February 28, 2023
या अपघातामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सकाळी ८ वाजून ४६ मिनिटाला झालेल्या या अपघाताने प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. या अपघातानंतर रेल्वे आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. रुळावरून घसरलेले तीन डबे पुन्हा एकदा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.