नागपूर : मामा, भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नागपुरातून समोर आलीय. १७ वर्षीय भाची घरात एकटीच असल्याचा फायदा घेत मामाने तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून श्रीराम (वय ३५ वर्ष) असं अटक केलेल्या मामाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मामा श्रीराम याला दारूचं व्यसन आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वाईट नजर होती.
दरम्यान, आरोपी २० फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात तरुणी एकटीच होती. तरुणीला एकटं पाहून मामाची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत बळजबरीने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला. यानंतर आरोपीने कोणाला सांगितले तर मी तुझा जीव घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
हे पण वाचा..
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल
अखेर झुंज अपयशी ठरली ; अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू
सीमा सुरक्षा दलमध्ये मेगाभरती सुरु ; दहावी+आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी..
मामाची धमकी ऐकून मुलगी घाबरली आणि तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. आरोपीचे यामुळे मनोबल वाढले आणि आई-वडील घरी नसताना तो घरी येऊन अश्लील कृत्य करू लागला. सततच्या छेडछाडीला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.