भुसावळ – मध्य रेल्वे भुसावळ विभागामध्ये भुसावळ बडनेरा सेक्शन मध्ये शेगांव स्टेशनवर पादचारी पुलावर गर्डरचे कार्य करीत असल्यामुळे 16 जूनला चार तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याकरिता काही पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक 51183 भुसावळ नरखेड पॅसेंजर गाड़ी दिनांक 16 जून 2019 ला रद्द करण्यात आलेली आहे. गाड़ी क्रमांक 51184 नरखेड भुसावळ पॅसेंजर गाड़ी दिनांक 16 जून 2019 ला रद्द करण्यात आलेली आहे. गाड़ी क्रमांक 51151 नवी अमरावती नरखेड पॅसेंजर गाड़ी दिनांक 16 जून 2019 ला रद्द करण्यात आलेली आहे. गाड़ी क्रमांक 51152 नरखेड नवी अमरवती पैसेंजर गाड़ी दिनांक 16 जून 2019 ला रद्द करण्यात आलेली आहे.
या कामामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास प्रवाश्यानी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे हे विशेष ब्लॉक प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक आहे.