मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे.कारण मनसेचे मसल मॅन मनीष धुरी यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून आपल्या सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र अन्य राजकीय पक्षात जाणार नसल्याचं मनीष धुरी यांनी या पत्रात म्हटलं आहे.
मनिष धुरी हे मनसेचे अंधेरी विभागाचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच मनिष धुरी हे राज ठाकरेंचे भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या अशा तडकाफडकी राजीनाम्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता धुरी यांच्या जागी अंधेरी विभाग अध्यक्षपदाची धुरा कुणाकडे जाणार? अशी चर्चा रंगली आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधीही होण्याची शक्यता आहे.