जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. ठाकरे गटांच्या या आरोपावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले नेमकं ना. पाटील?
होय, एकनाथ शिंदे यांच्यासाठी गद्दारी केली. क मराठा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी गद्दारी केली. मग आज हा गुलाबराव पाटील मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतो, हा तुमच्या मतदारसंघाचा जयजयकार असल्याचेही गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.”
आम्ही मराठा मुख्यमंत्री केला मी वेडा आहे का? असा सवाल त्यांनी केला. जे टीका करता त्यांना माझे आव्हान आहे. शरद पवार, शरद पवार काय करतात, मग एकनाथ शिंदे कोण आहे? एक मराठा चेहरा मुख्यमंत्री आम्ही केला. त्यासाठी मी गद्दारी केली असे ते म्हणाले.
हे पण वाचा..
भीषण अपघात! सिमेंटच्या ट्रकची तीन बसेसला धडक, 15 जणांचा मृत्यू, 50 जखमी
कंटेनर वळण घेत असताना भरधाव दुचाकी आली अन्.. घटनेचा थरार व्हिडीओ व्हायरल
नवरदेवाला हसत-खेळत लावत होता हळद, पण क्षणात होत्याच नव्हतं झालं ; पहा हृदय पिळवटून टाकणारा Video
गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपुर्वीच आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत होता. ते म्हणाले होते की, गेली सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा. आदित्य ठाकरे यांना बोलताना ते म्हणाले, आत्ता जो पक्ष राहिला आहे, त्या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा असा सल्ला दिला आहे.