कोरोना महामारीपासून हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, चालताना, नाचताना, गाताना अचानक अनेक लोक हृदयविकाराचे बळी पडत आहेत. असाच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती वराला हळद लावत आहे. यादरम्यान ते अचानक खाली पडले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
मनोज काका नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ हैदराबादच्या काला पत्थर भागातील आहे. 40 वर्षीय मोहम्मद रब्बानी असे मृताचे नाव आहे. 20 फेब्रुवारी रोजी रब्बानी हे एका नातेवाईकाच्या घरी हळदी समारंभासाठी गेले होते. वराला हळद लावत असताना तो खाली पडला.
त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रिपोर्ट्सनुसार, रब्बानी यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
ऐसा पहले कभी नहीं था अचानक हो रही मौतो की बाढ़ आ गयी है ..!
सरकार को इस भयानक भयावह जानलेवा समस्या पर विचार करना चाहिए
इसके कारणों का पता चलना चाहिए pic.twitter.com/hPpTwijqPx— Manoj KAKA (@ManojSinghKAKA) February 23, 2023