रिवा : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. सिमेंटच्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 जण जखमी झाले आहे. त्यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीतून परतणाऱ्या लोकांना बसेस घेऊन जात होत्या. या अपघातातील जखमींना सिधीचे जिल्हा रुग्णालय, चुरहटचे सामुदायिक आरोग्य केंद्र आणि रेवाच्या संजय गांधी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे
ही घटना मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावरील रेवा-सिधी बोगद्याजवळ शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन या बसेस परतत येत होत्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह देखील सहभागी झाले होते.
रात्री ९ वाजता मोहनिया बोगद्यापासून काही अंतरावर हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथे भरधाव ट्रकने धडक दिल्याने दोन बस 10 फूट खोल दरीत कोसळल्या. महामार्गावरच एक बस उलटली. ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला.
या भीषण अपघातात भीषण अपघातात 15 बस प्रवाशांचा मृत्यू झाला. 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतरांच्या रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात 50 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. अनियंत्रित ट्रकने मागून उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली.
मदत जाहीर
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत.