जळगाव,(प्रतिनिधी)- व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडून समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव हा पदभार काढून त्यांच्या जागी नियमानुसार वर्ग- 1 राजपत्रित अधिकारी यांचे कडे समाजकल्याण अधिकारी चा पदभार द्यावा अशी मागणी समता सैनिक दल चे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी केली असून तसे निवेदन देखील मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे दिले आहे.
विजय निकम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या अधिपत्याखालील प्रभारी समाज कल्याण अधिकारी म्हणून श्री व्ही. एल. रायसिंग हे नियमबाह्य पदभार सांभाळीत आहे. रायसिंगे हे वेतन पडताळणी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि विशेष ते वर्ग दोन चे अधिकारी आहेत. ते राजपत्रित अधिकारी नाहीत तरी त्यांच्या कडे असलेला प्रभारी समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे. महोदय जिल्हापरिषद मधील प्रशासकीय कामकाजात पहिली घटना आहे की, जिल्हा परिषद मध्ये अनेक राजपत्रित अधिकारी असताना व जळगाव जिल्हयात सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग जळगांव हे असतांना देखील रायसिंग यांना पदभार देण्यात आला आहे. हा हट्टाहास कश्या साठी…? मा. प्रधान सचिव व आयुक्त यांनी स्पष्ट सांगितले आहे की, रायसिंगे यांचा पदभार काढून त्याठिकाणी वर्ग-१ अधिकारी नेमावे तरी जिल्हा परिषद जळगांव मा. प्रधान सचिव व मा. आयुक्त यांच्या पत्राची दखल घेत नाही. महोदय हा एक प्रकारे भ्रष्टाचार ला खतपाणी घालण्याचा प्रकार सुरू आहे.
तरी आमची आपणांस पुनःश्च या पत्राद्वारे आपणास विनंती आहे की. श्री. व्ही. एल. रायसिंग यांचा पदभार काढण्यात यावा आणि नियमानुसार त्याठिकाणी वर्ग च्या दर्जाचा अधिकारी समाज कल्याण अधिकारी म्हणून पदभार देण्यात यावा. असे आपणास संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली या संदर्भात आम्ही आपणास समक्ष भेटून आपण आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण श्री व्ही. एल. रायसिंगे यांच्या कडील प्रभारी समाज कल्याण अधिकारी पदभार न काढल्यास आम्ही संघटना च्या वतीने आपल्या कार्यालय समोर संवैधानिक पध्दतीने आंदोलन करण्यात येईल. याची आपण नोंद घ्यावी.