मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. सोशल मीडियावर मुंबईतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. काही व्हिडिओ हृदयाला स्पर्श करतात तर काही व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावतात. अशातच सध्या एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ही छोटी व्हिडिओ क्लिप @Madan_Chikna नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका श्वानाला ट्रेनखाली येण्यापासून वाचवताना दिसतो.
Mumbai is a very busy city, no one is free, no one cares for each other.
Meanwhile Mumbaikars: pic.twitter.com/IgASgWdNwV
— Godman Chikna (@Madan_Chikna) February 22, 2023
यादरम्यान रेल्वे प्लॅटफॉर्मवर अनेक लोक उभे असतात. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 1.8 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे, तर 10 हजारहून अधिकांनी लाईकही केला आहे. मुंबईला आपल्या फास्ट लाईफस्टाईलसाठी आणि नाइटलाइफसाठी ओळखलं जातं. याच कारणामुळे याला ‘city that never sleeps’ असं नावही दिलं गेलं आहे. मात्र अनेकदा धावपळीच्या आणि कामाच्या व्यापात असलेल्या या मुंबईकरांचा वेगळा चेहराही पाहायला मिळतो, हेच दाखवणारा हा व्हायरल व्हिडिओ आहे.
असा दावा केला जात आहे, की व्हायरल होणारा हा व्हिडिओ मुंबईचा आहे. क्लिपमध्ये एक श्वान रेल्वे ट्रॅकवर दिसत आहे. एक व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. यादरम्यानच ट्रेन ट्रॅकवर येते. मात्र सुदैवाने ट्रेनचं स्पीड कमी असतं. युवक श्वानाला वाचवतो आणि मग त्याला उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवतो. यानंतर तो स्वतःही प्लॅटफॉर्मवर चढतो. तरुणाच्या या कृत्यानं नेटकऱ्यांचं मन जिंकलं असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.