एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. एका तरुणीनं हजारो फुट उंचावरून उडी मारली. हा व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी का होईना काळजात धस्स झाल्याशिवाय राहात नाही.
हा पूल जमिनीपासून किमान १ हजार फुट उंचावर असेल. या तरुणीसोबत एक स्केटबोर्ड आहे. तर ती या स्केटबोर्डवर उभी राहून थेट खाली उडी मारते. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? किंवा ती तरुणी कोण आहे? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पण ज्या ठिकाणी ही स्टंटबाजी केलीय ती जागा नक्कीच युरोप किंवा अमेरिकेतील असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भारतात अशा प्रकारचे पूल अद्याप कुठेही बांधलेली नाहीत.