मुंबई : आज शनिवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांकडून आज शनिवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहे. त्यात आज महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळाल्याचे दिसून येतेय.
आज महाराष्ट्रात पेट्रोलचा स्वस्त झाल्याचे वृत्त एका राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे. आज पेट्रोल दर 1.02 रुपयांनी कमी होऊन 106.15 रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेल 99 पैशांनी घसरून 92.67 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे,
मात्र, याशिवाय अनेक राज्यांमध्ये इंधन महाग झाले आहे. पंजाबमध्ये पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ झाली आहे. तामिळनाडू, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकातही इंधनाचे दर वाढले आहेत. चले आहे.