नवी दिल्ली : तुमच्या घरात किंवा कुटुंबात नुकतेच लग्न असेल, तर तुमच्यासाठी सोने खरेदीचा सुवर्णकाळ चालू आहे. गेल्या काही दिवसांत वेगवान विक्रम रचणाऱ्या सोन्याच्या दरात २३०० रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय चांदीच्या दरातही सुमारे चार हजार रुपयांची घट झाली आहे. दर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा दर 58882 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. याशिवाय 16 जानेवारीला चांदीने 69167 रुपयांची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र आता त्यांच्यात मोठी घसरण होताना दिसत आहे.
एमसीएक्सवर सोने आणि चांदी वाढली
सराफा बाजारात सोन्यामध्ये घसरण दिसून आली असेल, परंतु गुरुवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोने आणि चांदी दोन्हीमध्ये वाढ दिसून आली. दोन आठवड्यांपूर्वी सोने 58,000 रुपये आणि चांदी 71,000 रुपयांवर पोहोचली होती. गुरुवारी दुपारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 46 रुपयांच्या वाढीसह 56172 रुपयांवर व्यवहार करताना दिसून आले. त्याचवेळी चांदीच्या दरातही 152 रुपयांची वाढ होऊन तो 65573 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 56126 रुपये आणि चांदीचा भाव 65421 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
हे पण वाचा..
VIDEO मुंबईत द बर्निंग ट्रेनचा थरार! धूर निघू लागताच अन्…
10वी उत्तीर्णांनो घाई करा! डाक विभागात 40889 पदांसाठी भरती, अर्जसाठी उरले अवघे काही तास..
सर्वोच्च न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ; म्हणाले..
सराफा बाजारात संमिश्र कल
सराफा बाजारात गुरुवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) गुरुवारी जाहीर केलेल्या किमतीनुसार, 24 कॅरेट सोने 56343 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. चांदीच्या दरात किंचित वाढ दिसून आली आणि तो 65474 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. बुधवारी सोने 56478 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 65411 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
गुरुवारी 23 कॅरेट सोन्याचा दर 56117 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 51610 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 42257 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.