मुंबई : मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतल्या आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या चाकातून अचानक धूर निघू लागल्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी मध्येच लोकल थांबवली आणि खाली उतरले. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.
काय आहे नेमकी घटना?
आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ कसारा-सीएसएमटी लोकलला अचानक आग लागली. लोकलच्या चाकातून धूर निघू लागला. ते पाहून लोकलला आग लागल्याचं समजून डब्ब्यात असलेल्या प्रवाशांनी लोकल ट्रेनमधून उड्या टाकल्या. या सर्व घटनेची माहिती तिथल्या एका प्रवाशाने आसनगाव स्टेशन मास्तरांना दिली. लोकल ट्रेनमधून उड्या घेऊन खाली उतरून कामावर जायला उशीर नको म्हणून प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवरून पायी चालत आसनगाव स्टेशन गाठलं.
Mumbai local train's wheel caught fire today mrng nr Asangaonrailway stn. After noticing d fire,passengers started panicking & jumped dwn frm d train.d wheels of d train caught fire due to friction in d brakes.d entire incident created chaos on tracks near d Asangaon railway stn. pic.twitter.com/4RWOZfLTg1
— ℝ???????? ???????????????? (@Rajmajiofficial) February 16, 2023
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतू लोकलमधील चाकांच्या ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. प्रचंड धूर आणि आगीच्या घटनेमुळे ही लोकल आणि डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांची एकच धावपळ उडाली होती. डब्यातील प्रवाशांनी आपत्कालीन साखळी खेचून गाडी थांबवली. लोकल थांबल्यानंतर प्रवाशांनी लोकलमधून उड्या घेतल्या. प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या आगीवर पाणी टाकून ती आटोक्यात आणली. या घटनेमुळे २० मिनिटं गाडी खोळंबळी होती. त्यानंतर ही लोकल कारशेडकडे रवाना झाली.