नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी सत्ता संघर्षाचा घटनाक्रमच न्यायालयासमोर मांडला. यादरम्यान, राज्यातील सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असलयाचा दावाही हरीश साळवे यांनी केला. तसेच अजय चौधरी यांची गटनेते पदाची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितले.
एकनाथ शिंदे हे राज्याचे कायदेशीर मुख्यमंत्री आहेत. कारण शिंदे यांनी कायदेशीरपणे बहुमत सिद्ध केलं आहे. राज्यातील सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे हे जबाबदार आहे. कारण त्यांनी राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगूनही ठाकरे बहुमत सिद्ध करू शकले नाही. पुरेसा वेळ असूनही त्यांनी बहुमत सिद्ध केलं नाही. त्यामुळे सरकार कोसळण्यास ठाकरेच जबाबदार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा..
आधी प्रेमाचे सूत जुळले, मग लैंगिक संबंध ठेवले अन् त्यानंतर पुढे जे घडलं ते भयंकरच
आता पालघरमध्ये ‘श्रद्धा’सारखी हत्या, प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला आणि मग…
शिंदे सरकारचा मोठा निर्णय ; धान लागवडीसाठी शेतकऱ्यांना देणार १५ हजार रुपये
अविश्वास असतानाही आमदारांना अपात्र ठरवलं
यावेळी हरीश साळवे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याही पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अधिकार नसताना झिरवळ हे उपाध्यक्षपदावर बसून होते. त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव असतानाही त्यांनी 16 आमदारांना अपात्र ठरवलं.