सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही.. आता अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल.या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी एका कुत्र्याच्या पिल्लाला उचलून त्याच्या पायाला पकडून गरगर फिरवताना दिसत आहेत. हसत खिदळत त्याला त्रास देतानास हवेत गरगर फिरवताना दिसत आहेत.
प्राणीमात्रांवर प्रेम कराव, काळजी करावी असे आपण नेहमी म्हणतो, आणि अनेकजण प्राण्यांना जिवापाड जपत असतात ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
https://twitter.com/AwanishSharan/status/1621768274303393794
हा व्हिडिओ 33 सेकंदाचा आहे, जो तुमचं ही लक्ष विचलित करू शकतो. यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी कुत्र्याच्या पिल्लाला पायांनी पकडून हवेत हलवताना दिसत आहेत. तो कुत्र्याच्या माकडांच्या दिशेनेही ढकलतो. मात्र, शेवटी मुलगी पिल्लाला त्याच्याकडून हिसकावून घेते आणि त्याच्यावर प्रेम करते. हे दृश्य पाहून लोक त्या युवक-युवतीवर संतापले आहेत.