पाचोरा,(प्रतिनिधी)- सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र शासनाची मुलींसाठीची महत्वाकांक्षी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानअंतर्गत ही योजना देशभरात सुरू करण्यात आली. ही योजना विशेष मुलींसाठी असून, केंद्र शासनाची सर्वात कमी गुंतवणूकीची बचत योजना आहे. मुलींच्या लग्नाच्या वेळी किंवा उच्च शिक्षण घेताना ही गुंतवणूक अतिशय फायदेशीर ठरते. सुकन्या समृद्धी बँक किंवा पोस्ट खात्यात दरवर्षी किमान रु. २५०/- किंवा जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंत रक्कम भरून गुंतवणूक सुरू करता येते. खाते उघडल्यापासूनच्या तारखेपासून ते मुलीचे २१ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीच्या लग्नाच्यावेळी योजनेची मॅच्युरिटी होते व चांगल्या व्याजदराने ठेवी परत मिळतात. तसेच 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते.
या योजनेच्या विशेष मोहीमेअंतर्गत जळगांव येथील डाक अधिक्षक भोजराज चव्हाण साहेब व त्यांचे सहकारी यांनी पाचोरा नगपरिषदेत योजनेच्या विशेष प्रचार/ प्रचार मोहीमेनिमीत्त भेट दिली असता योजनेनचे महत्व पटवून देत मोहीमेचा शुभारंभ पाचोरा येथील नगरपालिका कर्मचारी ललित रमेश सोनार यांची कन्या सिध्दी हीच्या नावाने नविन खाते उघडून करण्यात आला.
या निमीत्ताने पोस्ट प्रशासनाकडून सोनार परिवाराचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जळगांव येथील डाक अधिक्षक भोजराज चव्हाण साहेब, स्टेनो संतोष जलनकार, नगरपालिकेचे प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, ध्येय परिवाराचे पत्रकार संदिपभाऊ महाजन, सतिष पाटील, मेल ओवरसिअर विनोद तडवी, रुपेश चौधरी, पाचोरा येथील पोस्ट मास्टर राजेंद्र पाटील, कर्मचारी वसंत पाटील, न.पा.शिपाई किशोर मराठे आदी उपस्थित होते.