इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र उद्यापासून (२७ जानेवारी) सुरू होत आहेत. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाने संबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. यासाठी कोणतेही अतीरिक्त शुल्क विद्यार्थ्यांकडून घेऊ नये असेही सांगण्यात आले आहे.
राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध होतं आहे. हे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून आणि स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. तसेच प्रवेशपत्रात विषय, माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्यात, असे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचाच..
पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती
महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
राशिभविष्य २६ जानेवारी : ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील
तसेच दिलेल्या प्रवेशपत्रात छायाचित्रात सदोष असेल तर त्यावर विद्यार्थ्याचे दुसरे छायाचित्र चकटवावे. तसेच त्यावर मुख्यध्यापकांची स्वाक्षरी आणि शिक्का घ्यावा. तसेच विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र गहाळ झाले तर, पुन्हा त्याची प्रत काढून घ्यावी आणि त्यावर लाला रंगाच्या शाईने द्वितीय पत्र असल्याचा शेरा द्यावा. तरच विद्यार्थ्याला परिक्षेस बसता येईल. असे राज्य मंडळा मार्फत सांगण्यात आले आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.