जळगाव – तालुक्यातील कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी भेट देऊन ग्राम पंचायत सदस्य आणि ग्रामस्थांशी चर्चा करून आरोग्य केंद्रातील समस्यां जाणून घेतल्या. त्यावर उपाय योजना आणि अमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र आवारात लाईट नसल्याने ते लावण्याच्या यावेळी सूचना दिल्या . सकाळी ८ वाजता ओपीडी सुरु ठेवली पाहिजे. यासह वैद्यकीय अधिकाऱयांनी रात्री मुक्कामी राहून सेवा बजाविण्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले. याशिवाय बांधकाम दुरुस्ती करण्यात येणार आहे. यावेळी उपसरपंच अनिल सपकाळे,सुमनबाई सोनवणे,सखुबाई सपकाळे, निलेश भंगाळे, जितू राणे,किरण राणे, विनोद सपकाळे,तालुका आरोग्यधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. मेघना चव्हाण , आदी उपस्थित होते.