चेन्नई: तामिळनाडूच्या अरकोनममध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन कोसळून किमान चार जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 9 जण जखमी झाले आहे. रानीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या शेजारी किलीवेदी भागात मंडियम्मन मंदिर मैलार उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
<
मिळालेल्या माहितीनुसार, रानीकोट जिल्ह्यातील अरक्कोनम भागात असलेल्या नेमिलीच्या मंडिअम्मन मंदिरात परिसरातील अनेक गावातील लोक जमले होते. मायलेरू नावाच्या सणाबद्दल खूप उत्साह होता आणि मंडिअम्मन मंदिरात लोकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रथेनुसार लोक क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. त्यानुसार मुथू कुमार, बूपलन आणि जोठी बाबू हे देखील क्रेनला लटकून पुष्पहार घालण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, अचानक तिघेही ज्या क्रेनला पुष्पहार घालण्यासाठी लटकले होते, ती क्रेन असंतुलित झाली.
https://twitter.com/Raghuvp99/status/1617229783787769856