मुंबई : लग्नसराईत सोन्याचे दर तेजीत असल्याचं पाहायला मिळत असून या आठवड्यातही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी सोने 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
तर गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 13 जानेवारीरोजी सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याचे दर सातत्याने नवे उच्चांक गाठत आहेत. आयबीजेए च्या दरानुसार सोमवारी सोन्याचा भाव 56,814 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मंगळवारी हा भाव 56,825 रुपयांवर पोहोचला होता. बुधवारी थोडी किंमत घसरली. 10 ग्रॅमसाठी 56 हजार ६०० हून अधिक पैसे मोजावे लागले. शुक्रवारी हा दर 56 हजार 990 वर पोहोचला.
हे पण वाचा..
मोफत रेशन घेणार्या करोडो लोकांसमोर नवीन संकट, सर्व कार्डधारकांनी जाणून घेणे गरजेचे
शुभांगी पाटील यांनी घेतली नाथाभाऊंची भेट ; नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये काय घडणार?
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 56,254 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. यानुसार, या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 754 रुपयांची वाढ झाली आहे. या आठवड्यातील शुक्रवारी सोने सर्वात महाग झाले. या दिवशी सोन्याचे दर 56,990 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.