मुंबई : राज्यात महिलांवर होणारे अत्याचार थांबता थांबत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच एक राज्यात अतिशय चिड आणणारी घटना घडली आहे. एका गतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर या नराधमांनी घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शौचालयासाठी गेली असताना तीन विधीसंघर्ष मुलांनी तिला जबरदस्ती शौचालयात नेले. यातील एका मुलाने तिच्यासोबत जबरदस्ती अत्याचार केला, तर इतर आरोपींनी त्याचे मोबाईल चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर वायरल केले. वायरल झालेला व्हिडिओ मुलीच्य भावाने सोशल मीडियावर पाहिल्यानंतर घरातल्यांना बहिणीसोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
हे देखील वाचाच..
राज्याच्या ‘या’ विभागांमध्ये ८ हजार १६९ पदांची भरती ; संपूर्ण डिटेल्स वाचा
महाराष्ट्र भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा ; संपूर्ण यादी वाचा
सदर घटनेत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तीन विधीसंघर्ष मुलांविरोधात 376, 376 (जे) (एल), 323, 500, 34 सह कलम 4 पोक्सो सह कलम 66(ई) 67(बी) आय टी अॅक्ट अंतर्गग गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिघांची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.