लखनौ : सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण-तरुणी चालत्या स्कूटीवर रोमान्स करताना दिसत आहे. हा प्रकार यूपीमधील लखनऊच्या पॉश मार्केट हजरतगंजमधील आहे. या धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, रस्त्यावर मुलगा स्कूटी चालवत आहे आणि मुलगी त्याच्या समोर बसली आहे. इतकंच नाही तर ती मुलगी त्या मुलाला पुन्हा पुन्हा किस करताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.
तहजीब के शहर लखनऊ में बेशर्मी.. हजरतगंज में जान को जोखिम में डालकर सरेशाम स्कूटी पर बेशर्मी करते युवक-युवती का वीडियो हुआ वायरल.. लखनऊ की ट्रैफिक पुलिस को ये स्टंटबाज जोड़ा नहीं दिखा.. @Uppolice @lkopolice @dcptrafficlko pic.twitter.com/8SOfrHYuxU
— Vivek K. Tripathi (@meevkt) January 17, 2023
पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीस्वाराने व्हिडिओ बनवला
चालत्या स्कूटीवरून तरुण आणि तरुणी रोमान्स करताना दिसताच त्यांच्या स्कुटीमागे असलेल्या एका दुचाकीस्वाराने त्याच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या संपूर्ण प्रकरणात अद्याप पोलिसांचे कोणतेही म्हणणे समोर आलेले नाही.