नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम-किसान योजनेचा 13 व्या हप्त्याचे 2000 हजार रुपये या महिन्यात सरकारकडून जारी केला जाऊ शकते. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. पीएम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकर्यांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कृषी संबंधित विविध कामांसाठी मदत केली जाते. या योजनेंतर्गत, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळण्यास पात्र आहे. मात्र, यावेळी पीएम किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकत नाहीत.
फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जातात ज्यांची पीएम किसान योजनेत नोंदणी झाली आहे आणि त्यांचे केवायसी देखील झाले आहे. दुसरीकडे, जर नोंदणी झाली असेल परंतु केवायसी केले नसेल, तर 13 व्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात येणार नाहीत. PM किसान सन्मान निधी अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी KYC असणे खूप महत्वाचे आहे.
हे सुद्धा वाचा..
शुभांगी पाटील नॉट रिचेबल, गिरीश महाजन म्हणाले…
अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिली आनंदाची बातमी ! या वस्तूवरील कर माफ
आजोबा मांडीवर बसवतात अन्.. 11 वर्षीय मुलीचा धक्कादायक खुलासा
केवायसी ऑनलाइन करायचे असल्यास, ओटीपी आधारित ईकेवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. शेतकरी बायोमेट्रिक आधारित केवायसी देखील करू शकतात. बायोमेट्रिक केवायसीसाठी सीएससी केंद्रांना भेट देऊन केवायसी करता येईल. त्यामुळे जर पीएम किसानच्या 13व्या हप्त्याचा लाभ हवा असेल, तर लवकरच केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.