पोखरा: काठमांडूहून 72 जणांना घेऊन जाणाऱ्या विमान रविवारी सकाळी नेपाळमधील पोखराजवळ दुर्घटनाग्रस्त झालं. या विमान अपघातात 68 प्रवाशांचा बळी गेला आहे. यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
विमानात प्रवास करणाऱ्या कोणालाही आपला जीव जणार आहे याची काहीच कल्पना नव्हती. त्यातील एक तरुण मस्त फेसबूक लाईव्ह करत होता. त्याच्या फेसबूक लाईव्हचाच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात तरुण सुरूवातीला विमानातून बाहेरील दृश्य दाखवत आहे. पुढच्याच क्षणी अचानक त्याच्या हातातील फोन खाली पडतो आणि माणसांचा आरडाओरडा ऐकू येत आहे. तसेच नंतर विमानाला लागलेली आग दिसत आहे.
नेपाल प्लेन हादसे से पहले फेसबुक का लाइव वीडियो#NepalPlaneCrash pic.twitter.com/N7lyXS8HEV
— Dhyanendra Singh (@dhyanendraj) January 15, 2023
या घटनेचा हा व्हिडिओ (Video) वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरत चालला आहे. झालेल्या दुर्घटनेत पाच भारतीय नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. सोनू जैस्वाल (वय ३५), संजय जैस्वाल (वय ३५), अनिल कुमार राजभर (वय २७), अभिषेक कुशवाह (वय २५), विशाल शर्मा (वय २२) या भारतीय नागरिकांसह विमानातील ११ परदेशी आणि ५३ नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.