एलसीबीच्या पथकाची कारवाई ; कारसह चालक ताब्यात
जळगाव – धरणगाव पिंप्री रस्त्यावर आज एका कारने अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर गुटखा नेत असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यावरून महेंद्र लोगान कार मधून सुमारे ५ लाख ८६ हजारांचा गुटखा पकडण्यात आला .
याबाबत माहिती अशी कि एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना गुप्त माहिती वरून आज महेंद्रा लोगान या कारमधून अवैधरित्या गुटखा नेत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून महेंद्रा लोगान क्रमांक एमएच -१८ डब्ल्यू ४३३५ या पांढर्या रंगाच्या कारमध्ये हॉटेल साई समोर रस्त्याच्या कडेला थांबले होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास कार चालक रवींद्रसिंग राजपूत वय २४ याची विचारपूस केली . कारची तपासणी केली असतात त्यात डिक्कीमध्ये ५ लाख ८६ हजर ३४ रुपयांचा गुटखा गोण्यांमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले , अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहायक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू रोहम , सपोनि महेश जानकर , पोहेकॉ रवींद्र घुगे, विनायक पाटील, प्रमोद लाडवंजारी, इद्रिस पठाण यांच्या पथकाने हि कारवाई केली .