मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वयाची ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मोफत बस प्रवास सुरू केला आहे. तर, ६५ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना यापूर्वीपासूनच तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत आहे. मात्र, अशातच आता शिंदे-फडणवीस सरकार आणखी मोठी योजना आखण्याच्या तयारीत आहे. यानुसार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन करता येणार आहे. एसटी महामंडळामार्फत नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता मेगा प्लॅन आखण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत शासननिर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील ६५ वर्षांवरील नागरिकांना ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला होता. या योजनेला ज्येष्ठ नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. आता ज्येष्ठांना आणखी खूष करण्याकरता शिंदे फडणवीस सरकार मोफत देवदर्शन घडवणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला देण्यात आले आहेत.
प्रत्येक शनिवारी-रविवारी ज्येष्ठ नागरिक मोफत देवदर्शन करू शकणार आहेत. यासाठी दोन हजार एसटी उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. या सेवेचा लाभ घेताना केवळ प्रवास मोफत असणार आहे. प्रवासादरम्यान ज्येष्ठ प्रवाशांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार आहे.
हे पण वाचा..
संतापलेल्या हत्तीने पाठलाग करत कार सोंडीने उचलली अन्.. VIDEO पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल
१२ वर्षीय मुलीवर अत्याचार; मुलीने दिला बाळास जन्म, यावल तालुक्यातील धक्कादायक घटना
मोठी बातमी ! भारत जोडो यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अॅटॅक, राहुल गांधींसमोरच झाले निधन
मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा…
पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता हा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. तसंच, या तीर्थक्षेत्रांमध्ये असलेल्या धर्मशाळा, यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या ठेवण्यात येणार आहेत.