सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सोशल मीडियावर सतत नवनवे व्हिडिओ व्हायरल होत राहतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक भुकेलेला हत्ती गाड्यांवर हल्ला करताना दिसत आहे. हत्ती हा अतिशय बलाढ्य मात्र काहीसा शांत प्राणी आहे. सहसा हा प्राणी कोणावर हल्ला करताना दिसत नाही.
मात्र, तो आक्रमक झाल्यास आणि चवताळल्यास समोर कोणीही आलं तरी त्याला सोडत नाही. अशाच या हल्ला करणाऱ्या हत्तीचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
Hungry elephants angry at Narengi army camp in Guwahati. Chasing to break the car. pic.twitter.com/vMK8o5tQRU
— Nandan Pratim Sharma Bordoloi (@NANDANPRATIM) January 13, 2023
व्हिडिओमध्ये दिसतं की भुकेनं व्याकूळ झालेला हा हत्ती अतिशय संतापला आहे. हत्ती रस्त्याने ये-जा करणाऱ्या गाड्यांचा पाठलाग करून त्यावर हल्ला करत आहे. गाडीमागे धावत तो आपल्या सोंडीने पूर्ण कार उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दुसऱ्या कारमध्ये असलेल्या व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.