नवी दिल्ली : अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वीच छोट्या व्यावसायिकांसाठी सरकारकडून एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे सरकार 2023 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यावरील विक्रेत्यांना 5,000 रुपयांपर्यंतचे सूक्ष्म कर्ज देण्यावर विशेष भर देणार असल्याचे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
डिजिटल इंडिया पुरस्कार वितरण समारंभात वैष्णव म्हणाले, “2023 मध्ये, रस्त्यावर विक्रेत्यांच्या 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंतच्या छोट्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोप्या पद्धतीने क्रेडिट सुविधा पुरविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल,” ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाला डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी 4G आणि 5G दूरसंचार सेवा देशाच्या सर्व भागात नेण्यासाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मंत्री म्हणाले की, देशात या वर्षी स्वदेशी विकसित 4G आणि 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होताना दिसेल. ते म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार देशात लवकरच इलेक्ट्रॉनिक चिप निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.
हे पण वाचा..
FCI घोटाळ्याबाबत CBI ची कारवाई ; आतापर्यंत केला ‘इतक्या’ लाखाचा ऐवज जप्त, ७४ आरोपींविरुद्ध गुन्हा
जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा ; दिला ‘हा’ मोठा निर्णय
पत्नीला सोडून सरकारी कर्मचारी कॉल गर्लच्या प्रेमात पडला ; अन् मग.. पुढे काय झालं वाचा
प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी (SVANidhi) योजना जून 2020 मध्ये सूक्ष्म-क्रेडिट सुविधा म्हणून सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश रस्त्यावर विक्रेत्यांना कोविड-19 महामारीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सक्षम करणे हा आहे.