नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या मोठ्या बातम्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने एक नवीन मार्ग अवलंबला आहे. याअंतर्गत सामान्य तिकिटावरील प्रवाशांना हिवाळ्यात स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येणार आहे.
जनरल तिकीट घेणारे प्रवासीही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात कडाक्याची थंडी पाहता भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय काही ठराविक काळासाठीच असेल. त्यामुळे जवनरलचे तिकीट काढलेल्या लोकांना सुरक्षित प्रवास करणे सोपे होणार आहे.
ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतात, त्या ट्रेनची माहिती मागविण्यात आली आहे. प्रवाशांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे त्या सर्व स्लीपर कोचचे रूपांतर जनरलमध्ये करण्याचा विचार करत आहे. हिवाळ्याच्या मोसमात अनेक प्रवासी स्लीपर कोचऐवजी एसी कोचने प्रवास करणे पसंत करत आहेत, त्यामुळे स्लीपर कोचमध्ये प्रवासी कमी आहेत. यामुळे रेल्वेने एसी कोच वाढविण्यास सुरुवात केली आहे.
हे देखील वाचाच :
तूर डाळ ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नये ! अन्यथा शरीराला नुकसान होऊ शकते..
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ! आता ‘या’ तारखेला होणार पुढील सुनावणी
अरे देवा! 500, 1000 रुपयाच्याच नव्हे तर सरकारने ‘या’ नोटाही बंद केल्या??
.. म्हणून संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन
हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोचमधील 80 टक्के सीट रिकाम्या असतात. सामान्य तिकिटाने प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.