आज आम्ही तुम्हाला अशा एका डाळीविषयी माहिती देणार आहोत, जी काही लोकांनी चुकूनसुद्धा ही खाऊ नये. अन्यथा त्यांच्या शरीराला नुकसान होऊ शकते. ती डाळ म्हणजे तूर डाळ. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.
तूर डाळ तुमच्या घरी अनेकदा तयार केली जात असेल. ही डाळ खूप चविष्ट असते, त्याचबरोबर ती खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असतं. ज्यामुळे शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते. पण काही लोकांनी चुकूनही ही डाळ खाऊ नये. अन्यथा या डाळीचं सेवन केल्यामुळे त्यांच्या शरीराला फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो.
किडनीच्या रुग्णांनी घ्यावी काळजी
ज्यांना किडनीचा आजार आहे, त्यांनी तूर डाळ खाणं टाळावं. या डाळीमध्ये भरपूर पोटॅशियम असतं, त्यामुळे किडनीचे आजार पूर्वीपेक्षा जास्त वाढू शकतात. या डाळीचं अति सेवन केल्यानं पोटात किडनी स्टोनसारखे आजारही होऊ शकतात, ज्यामध्ये तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या लोकांनी तूर डाळ न खाणे फायदेशीर आहे.
जास्त युरिक अॅसिडचा त्रास
युरिक अॅसिड जास्त असल्याचा त्रास असलेल्या लोकांनी तूर डाळ खाऊ नये. या डाळीमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरातील युरिक पातळी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. असं झाल्यास हात-पायांमध्ये तीव्र वेदना आणि सांध्यांना सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे अशा लोकांनी आरोग्याचा विचार करून तूर डाळीपासून अंतर ठेवणं केव्हाही चांगलं.
ज्या लोकांना अनेकदा गॅस-अॅसिडिटीची समस्या उद्भवते, त्यांनी तूर डाळ खाऊ नये. कारण ही डाळ पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ती खाल्ल्याबरोबर पोटदुखी, आंबट ढेकर आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. अनेक वेळा छातीत वरच्या बाजूस गॅस वाढतो. त्यामुळे छातीत जळजळ होणं, उलटी होणं, मळमळ होणं आदी समस्या निर्माण होतात. त्यामुळे अशा लोकांनी तूर डाळ खाल्ली नाही, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.