जळगाव : राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये देखील थंडीचा जोर वाढला आहे. जळगावचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली आले असून यंदाच्या तापमानातील हा निच्चांक आहे.
हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये तीन ते चार दिवस पारा १० अंशापेक्षा कमी झाला. परंतु, तर डिसेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कधी थंडी तर कधी गरमी जाणवत होती. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडीचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ही थंडी कायम आहे.
हे देखील वाचाच :
अरे देवा! 500, 1000 रुपयाच्याच नव्हे तर सरकारने ‘या’ नोटाही बंद केल्या??
.. म्हणून संजय राऊतांनी केलं गिरीश महाजनांचं अभिनंदन
संतापजनक ! स्कूलच्या आवारात 15 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
बँकेत नोकरी हवीय, तेही जळगावमध्ये? या बँकेत सुरुय मोठी भरती ; आताच अर्ज करा
जानेवारी महिन्यात किमान तापमानाची सरासरी १० अंशापर्यंत खाली आली. गेल्या पाच वर्षांत जानेवारी महिन्यातील तापमानाची सरासरी ही १३ अंश इतकी होती. मात्र, यंदा ही सरासरी ३ अंशानी कमी झाली आहे. आता पारा ६ अंशावर आल्याने कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावरदेखील परिणाम होताना दिसून येत आहे.