नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या निमित्ताने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.तसेच दुसरीकडे राऊतांनी भाजप मंत्री गिरीश महाजन यांचं अभिनंदन देखील केलं. कारण ‘सरकार पाडण्याचे स्वप्न हे भाजपचं होतं. शरद पवार यांच्यामुळे असं काही झालं नाही, ते जसे आरोप करत आहे. कारण, गिरीश महाजन हे आज स्पष्टपणे बोलले आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असे राऊत म्हणले.
जे पोटामध्ये होतं ते ओठांवर आलं आहे’ असं म्हणत राऊत यांनी भाजपवर टीका केली. तसंच, शिंदे सरकारचा मृत्यू ठरला आहे, मृतदेहामध्ये फुंकलेले प्राण असलेलं हे सरकार आहे, अशी टीकाही राऊतांनी केली.
हे देखील वाचाच :
संतापजनक ! स्कूलच्या आवारात 15 वर्षांच्या मुलाने केला 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार
बँकेत नोकरी हवीय, तेही जळगावमध्ये? या बँकेत सुरुय मोठी भरती ; आताच अर्ज करा
महाराष्ट्र हादरला ! विद्यार्थिनीवर शिक्षकाने शाळेतच केलं संतापजनक कृत्य
‘राज्यातील घटना बाह्य सरकार आहे. हे राज्याच्या हिताचे नाही आणि सोबत देशाच्या हिताचा देखील नाही. देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे की नाही या खटल्या या खटल्यावर सिद्ध होणार आहे. पैशाचा वारे माप पद्धतीने वापर आमदारांना पळून घेऊन जाणे या आमदाराला त्याची कारवाई करण्याकरता या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होत आहे. गेल्या चार महिन्यापासून सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाचे सुनावणी होत आहे आणि या संपूर्ण प्रकरणात फक्त तारखावर तारखा पडत आहे आणि घटनाबाह्य सरकार हे निश्चितपणे हसत आहे. आमच्यावर कोणतीच कारवाई होऊ शकत नाही त्यांना वाटत आहे. एक महाशक्ती आमच्या पाठीशी आहे त्यामुळे घटनाबाह्य सरकार चालत राहील महाशक्ती असो की कोणी असो आमचा या देशातील न्याय शक्तीवर विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.