नवी दिल्ली: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अनेक योजना राबविल्या जात आहेत. याच दरम्यान, एम किसान, सीएम किसन या योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट आली आहे. कारण राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या सहयोगाने महिला किसान योजना अंतर्गत महिलांना 50 हजार रुपये पर्यंतचे आर्थिक मदत मिळणार आहे.
महिलांना व्यवसाय करता यावा व त्यांनाही पुढे जात आहे त्यामुळे राज्य सरकारने महिला किसान योजना अंतर्गत अनुसूचित जाती व समाजातील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ देणार आहे, अनुसूचित जातीमधील ज्या उपजाती आहेत जसे की चर्मकार, ढोर, होलार मोची इत्यादी प्रवर्गातील महिलांना या योजनाचा लाभ दिला जातो.
या योजनेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत.
जी व्यक्ती अर्ज सादर करणार आहे तिचे वय १८ ते ५० वर्षापर्यंत असावे.
तहसीलदार किंवा त्या समान सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला.
ग्रामीण भागासाठी ९८००० व शहरी भागासाठी १२०००० एवढे उत्पन्न असणे गरजेचे.
अर्जदार व्यक्ती जो व्यवसाय करणार असेल त्या व्यवसायाचे त्या व्यक्तीस पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे.
अर्जदार व्यक्ती महाराष्ट्रील रहिवासी असावी.
अर्जदाराने यापूर्वी मंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
जी व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार आहे ती चर्मकार समाजातीलच असावी.