मुंबई : महाराष्ट्रात राजकीय वातावरण एका परिवर्तनाच्या दिशेने चालले असून 2024 ची तयारी सुरू आहे. पण त्याच्याआधीही परिवर्तन होऊ शकेल. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहे. राऊत दोन दिवशीय नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोल्ट होते.
दरम्यान, यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेले पदाधिकारी नारायण राणे, राज्य सरकार, मुख्यमंत्री यांच्यावर सडकून टीका केली. शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर असून शिवसेना हा एक महा वृक्ष आहे. या महावृक्षाचे बीज बाळासाहेबांनी पेरले असून सध्या कचरा पाला पाचोळा पडतो आहे, कचरा होतो, तो कचरा काही लोक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उचलून नेत आहेत. त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषण करत असल्याचे ते म्हणाले.
हे पण वाचा..
शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज
पवन एक्स्प्रेसमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला टीसींकडून बेदम मारहाण ; व्हिडीओ व्हायरल
सोने खरेदी करण्यासाठी खुशखबर.. सोने 3,800 रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीनतम दर
युवकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कोण कुणाला मारतंय हेचं कळेना, पाहा VIDEO
ते पुढे म्हणाले, अधिवेशन काळामध्ये स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नागपुरात होतो. यावेळी सरकारचा गोंधळ जवळून पाहिला. यावरून असे वाटते आहे कि सरकार अस्तित्वातच नाही, रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे प्रकरण समोर येत सरकार गेंड्याच्या कातडीप्रमाणे गप्पगार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, उदय सामंत यांचे प्रकरण काढले अशी अनेक प्रकरण अधिवेशन काळात येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं होते. संविधान कायद्यानुसार 16 आमदार अपात्र ठरतील. संविधान, घटना आणि कायदा देशात आहे. त्याचा व्यवस्थित वापर झाला तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा सूचक विधान संजय राऊत यांनी यावेळी केले.