जळगाव : पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाल्याचे लक्षात आल्यानंतर आता महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.
काय म्हणाले महाजन?
जळगावमध्ये बोलताना महाजन म्हणाले, माझ्या तोंडून अनवधानाने महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. यामध्ये कुणी राजकारण करू नये. तसेच, महाजन यांच्या विधानावर अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एकेरी उल्लेख झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले, महाराजांचा अनादर करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता, मी महाराजांचा किती समर्थक आणि अनुयायी आहे हे सर्वांना माहिती आहे.
हे पण वाचा..
मोठी बातमी : संजय राऊतांविरोधात अजामिनपात्र वॉरंट, नेमकं काय आहे प्रकरण?
संतापजनक ! बापाने केला पोटच्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, विकृतीत आईनेही दिली साथ
हे काय..! चक्क चाक नसलेला ट्रक धावतोय रस्त्यावर, व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल
नाशकात ठाकरे गटाला पुन्हा मोठं खिंडार! राऊतांच्या दौऱ्यापूर्वी असंख्य पदाधिकारी शिंदे गटात
शेवटी महाराज हे महाराज आहेत. महाराजांच्या नावाचा माझ्याकडून अनवधानाने एकेरी उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्यात कसला कमीपणा? आजकाल कुणी काही बोलले तर लगेचच चॅनलमध्ये, वर्तमानपत्रात जायचे, आरोप करायचे ही विरोधकांची पद्धत झाली आहे. विरोधक विकासावर बोलू शकत नाहीत म्हणून ते असेच विषय घेऊन पुढे येताय, असे म्हणत त्यांनी मिटकरी यांना टोला लगावला.