मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद इशारा दिला आहे. विरोध धर्माला नाही परंतु, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात नंगानाच सुूरु आहे त्या विकृतीला विरोध आहे. उर्फीला विरोध नाही तर तिच्या नंगा नाचला विरोध आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला दिला आहे. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
एक बाई भरदिवसा रस्त्यावर उघडी फिरते, नगण्य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्य? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे. एक महिला मला सतत मेसेज करत होती मला बोलायचे आहे. एक दिवस मला त्या महिलेने एक व्हिडिओ पाठवला. एक मुलगी अंगावर नगण्य कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचे प्रदर्शन करताना दिसली. ज्या महिलेने मला व्हिडिओ पाठवला तिच्याशी बोलले तेव्हा त्या म्हणाल्या माझी मुलगी याला बळी पडली आहे. त्याचमुळे मी भूमिका घेतली आहे. शिवाजी महाराज यांच्या राज्यात असा नंगा नाच चालू देणार नाही, असा इशारा यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला.
हे पण वाचा..
1986 मध्ये नवीन Bullet फक्त ‘एवढ्या’ रुपयात यायची ; व्हायरल होत असलेले बिल पाहून आश्चर्य वाटले
BSNL मध्ये तब्बल 11705 पदांसाठी होणार मेगाभरती
आजपासून ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही आयकर ; अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले आश्वासन
माझा विरोध उर्फीला नाही तिच्या नंगा नाच वृत्तीचा आहे. अरे आधी कपडे तर घाला मग ठरवा कुणी काय घालायचे. ज्या ठिकाणी समाज महत्वाचा असतो त्याठिकाणी राजकारण करू नये. पण दुर्दैवाने आपल्या राज्यात तसे झाले नाही. जो नंगा नाच सुरू आहे ते आपल्या महाराष्ट्र्ला शोभनीय नाही. असला नंगा नाच राज्यात चालू देणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या. कुणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असे महिला आयोग म्हणतंय. महिला आयोग म्हणत अशासाठी वेळ घालवणार नाही, महिला आयोगाला जाब विचारायचा नाही मग काय करायचे? केसेस सोडवणे तुमचे काम आहे. अशा अश्लील व्हिडिओची दखल घेतली नाही मग आयोगाच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचाराला.