पुणे : राज्यातील तापमानात सातत्यानं चढ उतार होत आहे. उत्तर प्रदेशात थंडीची लाट आली आहे. त्यासोबतच अतिथंड वारे तीव्र वेगाने वाहत आहे. त्याचा परिणाम राज्यातील अनेक ठिकाणी दिसून येतोय. राज्यात कुठे थंडीचा कडाका जाणवत तर कुठे ढगाळ वातावरणात आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorology Department) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात पावसाचा अंदाज
महाराष्ट्रातील खान्देश नाशिक नगर पुणे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या आज ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
5 Dec, ढगाळ आकाश …
Latest satellite obs at 9.30 am that indicates partly cloudy sky over N Madhya Mah, N Marathwada and Vidarbha.
Possibilities of light rains over these regions in coming 2 days as per the forecast by IMD. pic.twitter.com/mc5FRFO6jP— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2023
तर मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होवून थंडीचे प्रमाण कमी जाणवते. मुंबईसह कोकणात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नसून थंडीचा प्रभाव तिथे कायम असल्याची माहिती खुळे यांनी दिली. दरम्यान अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात अवकाली पावसानं हजेरी लावली आहे. त्या ठिकाणच्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे