पाचोरा (प्रतिनिधी)- पाचोरा येथील माळी समाज व बहुजन समाज संघटनांच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा स्मारका जवळच्या बाबुराव आनंदा मराठे व्यापारी संकुल परिसरात उभारण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाच्या प्रांगणात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचेसह माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर ,राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन या महापुरुषांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष संजय महाले, उपाध्यक्ष के.एस.महाजन, खलील देशमुख, सुनील शिंदे ,धनराज पाटील, सरपंच सुनील पाटील, डॉ संजय माळी, अनिल येवले, पप्पू राजपूत, माजी नगरसेवक वासुदेव महाजन ,अशोक मोरे ,दत्ता जडे,शशिकांत मोरे ,अतुल महाजन, नाना महाजन, संदीप महाजन,डॉ गोरख महाजन, सुदर्शन सोनवणे, सुधाकर महाजन, सुनील महाजन, सुनील मोरे, गणेश शिंदे, गणेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, अनिल पाटील, रवींद्र पाटील, दीपक आदीवाल, राहुल महाजन , माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील, श्रीराम महाजन, विकास पाटील, सतीश चौधरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, ग्राहक मंचचे चिंधू मोकळ, किशोर रायसाकडा,ॲड कविता रायसाकडा, ॲड भाग्यश्री महाजन,प्रा वैशाली बोरकर, ललिता पाटील,ॲड मनिषा पवार , ॲड मिना सोनवणे,प्रदीप पांडे, एस व्ही गीते,एम एस महाजन, रमेश पाटील, एस ए पाटील दिलीप जैन,नंदू शेलकर.आदि उपस्थित होते.
दिवसभर शहरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले प्रेमींनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले. याप्रसंगी ऍड भाग्यश्री महाजन, एस व्ही गीते, सुनील शिंदे, खलील देशमुख , किशोर डोंगरे आदींनी मनोगत व्यक्त करून सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणा संदर्भातील योगदानाचा आढावा घेतला. महापुरुषांच्या घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमला.